IMP...

सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

विभागीय शिक्षण परिषद - लातूर

लातूरात विभागस्तरिय एकदिवशीय शिक्षण परिषद संपन्न..........
प्रत्येक शाळेत ज्ञानरचनावाद सुरु व्हावाः डॉ. पुरुषोत्तम भापकर.
लातूरः- गरिबी-श्रीमंती हा शिक्षणातील भेदभाव आता संपला आहे. प्रत्येक शाळेतील मुलांना प्रगल्भ बनविण्याचा आम्ही ध्यास घेतला आहे. त्यामुळे एकही मुल शाळेच्या बाहेर राहता कामा नये आणि प्रत्येक शाळेत ज्ञानरचनावाद सुरु झाला पाहिजे असे मत राज्याचे शिक्षण आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांनी शुक्रवारी येथे बोलताना व्यक्त केले.
प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत येथील दयानंद शिक्षण संस्थेच्या सभागृहात आयोजित एक दिवशीय शिक्षण परिषदेचे उदघाटन करताना डॉ.पुरुषोत्तम भापकर बोलत होते. या प्रसंगी जि.प.च्या अध्यक्षा प्रतिभाताई पाटील कव्हेकर, उपाध्यक्ष अण्णासाहेब पाटील, विभागीय शिक्षण उपसंचाक वैजनाथ खांडके, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेशकुमार मेघमाळे , उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील डायट प्राचार्य,Eo, Beo, Adi, के.प्र., HM व शिक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती.
फुले-शाहु-आंबेडकरांच्या महाराष्ट्राने वैचारिक स्थान मिळवून समता प्रस्थापित केली आहे. सर्वच बाबतीत अग्रेसर असलेला आपला महाराष्ट्र शिक्षणात अन्य राज्यांच्या तुलनेत मागे पडला आहे. शिक्षणातही महाराष्ट्राला प्रथम क्रमांकावर आणायचे आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक शाळा ज्ञानरचनावादी बनवायची आहे. समाजहिताची ही चळवळ लक्षात घेऊन अनेक संस्था शिक्षणात उतरल्या आहेत ही समाधानाची बाब असल्याचे भापकर यांनी सांगितले.
शिक्षण हक्क कायदा आला, त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरु आहे. ८ वी पर्यंतचे शिक्षण सक्तीचे केले गेले. कोणत्याही विद्यार्थ्यास आठवीपर्यंत नापास करायचे नाही, प्रत्येक मुल शाळेत आले पहिजे असा हा कायदा, तर दुसर्‍या बाजूला शिक्षक् शिकवत नाहीत, वर्गात बोगस विद्यार्थी संख्या दाखवली जाते, असे आरोप सुरु झाले, त्यात काही प्रमाणात तथ्य होते. हे चित्र आता गेल्या वर्षभरात बदलले आहे, असे नमुद करुन शिक्षण आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर म्हणाले की, प्रत्येकजन काम करतो आहे, त्याला पाठबळ देण्याची गरज आहे. शिक्षकांना टार्गेट करण्याचे बंद झाले आहे. शिक्षकांचे स्थान देवाहार्‍यात आहे. ते खाली आले असेल तर त्यास आपणच जबाबदार आहोत. याकडे त्यांनी लक्ष वेधले.
विद्यार्थ्यांना आठवीपर्यंत नापास करायचे नाही या धोरणामुळे विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष झाले, परिणामी गुणवत्ता ढासाळली. असे स्पष्ट करुन डॉ.भापकर म्हणाले की, आपण आता प्रगत शैक्षणिक धोरण स्विकारले आहे. प्रत्येक मुल शाळेत आले पहिजे, ते शिकले पाहिजे नव्हे दर्जेदार शिक्षण त्याला मिळायलाच हवे. विस्तार अधिकारी कुमठे यांनी शाळा ज्ञानरचनावादी झाल्या पाहिजे यासाठी प्रचंड कष्ट घेतले आणि त्यांच्या आडनावातून कुमटे बीट पॅटर्न निर्माण झाला, ही सर्वांसाठी भुषणावह बाब असल्याचे ते म्हणाले.
या शिक्षण परिषदेत लातूर व उस्मानाबाद जिल्हयातील प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख,शिक्षक, साधनव्यक्ती यांनी आपल्या ज्ञानरचनावादी शाळांचे प्रोेजेक्टरद्वारा सादरीकरण केले. शिक्षण आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलीत करुन शिक्षण परिषदेचे उदघाटन करण्यात आले. प्रारंभी विभागीय उपसंचालक श्री खांडके साहेब,शिक्षणाधिकारी डॉ.गणपत मोरे, संजयकुमार राठोड, तृप्ती अंधारे आदींनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या एक दिवशीय शिक्षण परिषदेला मोठा प्रतिसाद मिळाला.

No comments:

Post a Comment