IMP...

सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

राष्ट्रमाता जिजामाता

                               जिजा माऊली गे तुला वंदितो मी,
                             जिजाऊच साक्षात वात्सल्य नामी ॥धृ॥

तुझ्या पाऊली लीन आम्ही सदाही,
तुझ्या साऊली हीन कोणीही नाही;
नसे दास कोणी नसे राव-स्वामी ॥१॥

तुझ्या धाडसाचे धडे दे आम्हाला,
तुझ्या पाडसाच्या स्मृती सोबतीला;
तयांच्या सवे गाजवू शौर्य आम्ही ॥२॥

तुझी सावली सर्व काळी असू दे,
कुठे दुःख कोणास काही नसू दे;
                        नसू दे अनारोग्य अंधार यामी ॥३॥

                                                    तुझ्या प्रेरणेने घडो देशसेवा,
                                                    तुझ्या चिंतनाने सुखी काळ जावा;
                                                    घडो अंत तो शांत साफल्यगामी ॥४॥
                                                    जय जय जिजाऊ ..... जय जिजाऊ.......
=============================================================

        राष्ट्रमाता जिजामाता  यांचा जन्म दि. १२ जानेवारी १५९८ रोजी (पौष पौर्णिमा शके १५१९) रोजी  सिंदखेड- राजा जि. बुलढाणा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव म्हसाळराणी तर वडिलांचे नाव लाखुजीराजे जाधवराव होते.
मध्ययुगीन कालखंडातील जागतिक इतिहासातील सर्वगुणसंपन्न एकमेव   व्यक्ती  म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.  या   व्यक्तीला हे जागतिक अढळ स्थान प्राप्त करून देणाऱ्या त्यांच्या माता व मानवतावादी आदर्श म्हणजेच जिजामाता. शिवबास जन्म देण्यापासून ते त्यांना छत्रपती पदापर्यंत पोहचवणारी एकमेव वैक्ती म्हणजेच शिवमाता - राजमाता - राष्ट्रमाता - जिजामाता होत. जिजामातेच्या निर्धाराचे सत्यचित्र म्हणजे शिवचरित्र.'
शिवबा, अफझलखानाच्या भेटेप्रसंगी तुम्ही कमी आलात तर भीती बाळगू नका. तुमच्या पाठीमागे मी बाळशंभूस छत्रपती बनावून स्वराज्याची निर्मिती करीन.' हा दृढनिर्धार मेंदूत सततजागृत ठेवणारी जिजाऊ! जिजामाता! शिवरायांच्या आयुष्यातील पन्नास वर्षापैकी पंचेचाळीस वर्षे त्यांच्यावर मायेची नज़र ठेवणारी राजमाता म्हणजेच जिजाऊ.


============================================================






No comments:

Post a Comment