Qr कोड कसा असतो?
लवकरच बालभारतीची सर्व पुस्तके Qr Code स्वरूपात येणार आहेत.हा Qr कोड कसा असतो? त्याचे कार्य काय? तो कसा वापरायचा असे नानाविध प्रश्न आपणासमोर पडले असतील... घाबरायचं काहीच कारण नाही. Qr कोड तयार करण्यासाठी वेगवेगळ्या website उपलब्ध असून काही websites मोफत Qr कोड तयार करण्याची सुविधा प्रदान करतात.
Qr code चे काय फायदे :
१)माहिती साठविण्याचं उत्तम माध्यम म्हणून Qr कोड कडे पाहिलं जात.
२) ही माहिती kb मध्ये साठविली जाऊन आपल्याला सांकेतिक इमेज स्वरूपात save करता येते.
३)कुठेही कधीही आपण ती इमेज ओपन करून माहिती वाचू शकतो.
४)निरनिराळया website किंवा महत्वाची माहिती यामध्ये save करता येते.
Google play store वर जर का तुम्ही गेलात तर Qr code संदर्भात निरनिराळे अँप्स उपलब्ध आहेत.
त्यातील सर्वात चांगले अँप्स म्हणून Qr droid या अँप्स कडे पाहिले जाते.
या अँप्स ची माहिती खाली.
Qr code
👉याच्या साहाय्याने तुम्हाला कोणताही Qr कोड स्कॅन करून त्यातील मजकूर वाचता येतो.
👉निरनिराळे वेब ऍड्रेस, ब्लॉग लिंक,टेक्स्ट स्वरूपातील माहितीचे Qr कोड आपण याच्या साहाय्याने बनविता येतात.
👉कॉन्टॅक्ट, business कार्ड याचे Qr कोड बनविता येतात.
👉अँप्स च्या लिंक आपणास save करून ठेवता येतात.
👉Qr कोड ला design करता येते.रंगसंगती मनाप्रमाणे देता येते.
👉तयार झालेला Qr कोड नावानिशी save करता येतो.
QR कोड निर्मिती
स्वतःचे BUSINESS CARD तयार करणे :
QR कोड निर्मिती व वापर
QR कोड निर्मिती व वापर याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व सहज सोप्या पद्धतीने निर्मिती तंत्र शिकण्यासाठी इच्छुक तंत्रस्नेही शिक्षकांनी प्रथम खाली दिलेले दोन ऍप्स आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलेले असावेत
1) QR कोड निर्मितीसाठी
QR Droid Code Scanner (DroidLa)
2) तयार केलेला कोड स्कॅन / रिड करण्यासाठी
NeoReaderQR & Barcode Scanner
किंवा
Free QR Scanner / QR Code Reader
No comments:
Post a Comment