IMP...

सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .


                        "  माझी  शाळा, माझा उपक्रम"
                            माझी शाळा, सुंदर शाळा
                                  =================================

                   "जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,बोथी ता.चाकूर जि.लातूर"

🌀शाळेची स्थापना-
12/09/1958.

🌀शाळेचा युडायस नंबर-
27281000301.

🌀शाळेचा email id-
zppsbothi@gmail.com

⚡आमचे ध्येय-⚡

"विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून भारताचा आदर्श नागरीक घडविणे"

🌻गावाबद्दल थोडक्यात-🌻

"बोथी हे गाव चाकूर तालुक्यापासून ०८ कि.मी.वर डोंगरामध्ये वसलेले टुमदार गाव आहे.
येथे तळे (डॅम) असून चाकूरला व इतर गावांना येथूनच पाणीपुरवठा व मत्स्यपुरवठा होतो.
मागील काळामध्ये गावामध्ये बांधकामासाठी लागणा-या चुन्याच्या भट्टया होत्या.
गावामध्ये सर्व जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.
'जिजाऊ प्रतिष्ठान, बोथीमार्फत गावामध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविले जातात.
येथे जिल्हा परिषदेची 1 ली ते 7 वी पर्यंत शाळा असून श्री केशवराव पाटील विद्यालय येथे 5 वी ते 10 वी पर्यंत ची शाळा आहे.
दोन अंगणवाडया आहेत व जवळच मल्ल्यापाचा डोंगर आहे.
असे हे निसर्गसौंदर्याने भरपूर नटलेले बोथी गाव आहे."

🌀शाळेचे काही माजी विद्यार्थी-🌀

💥शासकीय नोकरदार-

1⃣श्री प्रसाद अक्कानवरू
(S.P.Pune)

2⃣श्री प्रविण अक्कानवरू
(STI)
सोहम् क्लासेस,लातूर.

3⃣शिक्षक, पोलीस, वकील, तलाठी, एस.टी.महामंडळ, डाॅक्टर, मुख्याध्यापक, वनरक्षक इत्यादी पदावर सक्षमपणे कार्यरत आहेत.

 💥व्यावसायिक

ऊसतोड कामगार, हाॅटेल व्यवसाय, आधुनिक शेती, विटभट्टी,
किराणा दुकान, केश कर्तनालय, कुंभारकाम, वराहपालन, विणकाम, टेलरकाम, वेल्डिंग, फुलांचा व्यवसाय, लोहारकाम, बँडबाजापार्टी, राजकारण व समाजकारण इत्यादी.

💥शाळेत राबविले जाणारे उपक्रम-

🌴दुर्गुणांची होळी
🌴आदर्श परिपाठ
🌴परीपाठामध्ये भाषा विषयाच्या कृतियुक्त कविता.
🌴जो दिनांक तो पाढा
🌴आनंद नगरी
🌴प्रश्नमंजुषा,
🌴निसर्ग सहल, निसर्ग शाळा.
🌴चित्रकला स्पर्धा.
🌴रक्तगट हजेरी.
🌴कृतियुक्त शिक्षण
🌴वृक्षारोपण
🌴शासकीय G.R.चे वाचन.
🌴100%आधार कार्ड
🌴100% रक्तगट तपासणी.
🌴धोंडेजेवण
🌴राष्ट्रिय सण, उत्सव, जयंती, पुण्यतिथी.
🌴क्षेत्रभेटी
🌴220 वृक्ष शाळेत
🌴प्रत्येक शनिवारी बिनदप्तराची शाळा.
🌴🎯My school, My Activity🎯
द्वारे फेसबुक व वाॅटसअॅप वर शालेय उपक्रमांची प्रसिद्धी.
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
💥शासकीय योजना

🌴सुवर्णमहोत्सवी शिष्यवृती योजना.
🌴सावित्रीबाई फुले शिष्यवृती योजना.
🌴मुलींचा उपस्थिती भत्ता
🌴मोफत गणवेश.
🌴मोफत शालेय पोषण आहार व पुरक आहार.
🌴मोफत आरोग्य तपासणी.
======================

💥शाळेची यशोगाथा

♻कु.वैष्णवी संजयकुमार घुगे हिची सन 2012-2013 मध्ये "जवाहर नवोदय विद्यालय,लातूर" ला निवड.

♻कु.हर्षदा तुकाराम पवार हिचा सन 2014-2015 मध्ये तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये द्वितीय क्रमांक.

♻जि.प.प्रा.शाळा,
बोथी येथे सन 2014-2015 मध्ये आदर्श केंद्रसंमेलन व विज्ञान प्रदर्शनाचे यशस्वीपणे आयोजन.

♻ग्रामस्थ व विद्यार्थी यांच्याद्वारा दिनांक 05 सप्टेंबर 2015 रोजी शिक्षक दिनाचे आयोजन.
=======================
💥आमचे शिक्षकवृंद-

(1 मु.अ.,2 पदविधर,
4 स.शि.,1 रिक्तपद)

💎श्रीमती रायवाड कांता सटवाजी
[मुख्याध्यापक]
B.A.D.ed.
24 वर्षे सेवा

💎श्री दंडीमे धनाजी बाबाराव
[प्रा.पदविधर]
B.A.D.ed.
22 वर्षे सेवा

💎श्री लोहारे नागेश अशोकराव
[प्रा.पदविधर ]
B.A.Bed.
07 वर्षे सेवा

💎श्री जोशी गोपाळ रंगनाथराव
[सहशिक्षक]
S.S.C.D.ed.
24 वर्षे सेवा

💎श्रीमती सूर्यवंशी सुचिता गणपतराव
[सहशिक्षिका]
B.A.D.ed.
20 वर्षे सेवा

💎श्री वागलगावे जगन्नाथ परिक्षीती
[सह शिक्षक]
S.S.C.D.ed.
22 वर्षे सेवा

💎श्री सोदले जयराज नवनाथराव
[सह शिक्षक]
15 वर्षे सेवा.
M.A.B.ed.  D.S.M.
======================
💥मार्गदर्शक💥

⭐मा.श्री संजयजी पंचगल्ले.
{गटशिक्षणाधिकारी}
पं.स.चाकूर.

⭐श्री बापूराव मुरमुरे.
{शिक्षण विस्तार अधिकारी}
बिट-चाकूर

⭐श्री सत्यनारायण अधिकारी
{केंद्रप्रमुख}
संकुल-चाकूर.
 ======================


💡मातृभाषेतून शिक्षण हेच सर्वोत्तम शिक्षण
💡आमचे विद्यार्थी आमचे वैभव
💡मराठी माध्यम म्हणजे यशस्वीतेची पायरी
========================
 "मराठी शाळांची माहिती"या  मराठीचे शिलेदार व्हाट्सप समुहाच्या फेसबुक पानावर प्रसारित करण्यात आलेली ही शाळा क्रमांक (६२)
=========================
"मराठी शाळांचे शिलेदार" व्हाट्सप समुहातर्फे 'माझी शाळा माझे उपक्रम' या अभिनव उपक्रमांतर्गत
'मराठी शाळांची माहिती' या पानावर प्रसारीत करण्यासाठी
श्री.सोदले जयराज नवनाथराव (सहशिक्षक)
{तालुकाध्यक्ष}
शिक्षक काँग्रेस,
चाकूर
यांनी आपल्या शाळेची माहिती दिल्याबद्दल "हार्दिक अभिनंदन"
💐🌹🌷🌻🌷🌹💐
=======================
🙏सर्व शिक्षकवृंदाचे पुनश्च आभार🙏
=======================
 प्रस्तुत शाळेची माहिती उपक्रमाच्या छायाचित्रासह 'मराठीचे शिलेदार' समुहाच्या खालील फेसबुक पानावर प्रसारीत करण्यात आली आहे.

१) मराठी शाळांची माहिती
२) मराठीचे शिलेदार समुह
३) माझी शाळा माझे उपक्रम
४) मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत .




























No comments:

Post a Comment