IMP...

सुस्वागतम....या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

काळानुसार पालकांनी बदलायला हवं..


काळानुसार पालकांनी बदलायला हवं

 

शालेय शिक्षण पध्द्तीतकाळानुसार बदल होतो आहे किंबहुना झालेला आहे. मात्र या प्रणालीशी निगडीत असलेला घटक म्हणजेच विद्यार्थी ,शिक्षक व पालक याच बरोबर संबंधित घटक हे काळानुसार बदलताना दिसत नाहीत.आपले स्वत:चे तेच जुने विचार मांडताना दिसत आहेत.जर या बद्लणा-या काळानुसार पालक,शिक्षक व संबंधितांची विचार सरणी बदलली तर विद्यार्थ्यांचा म्हणजेच राष्ट्राचा विकास हा निश्चित होणार आहे.
यासाठी आपण थोरांनी थोड काळानुसार मागे वळुन पाहिलं पाहिजे.देशाला स्वातंत्र मिळाले ते १९४७ साली आणि प्रगतीची वाट्चाल सुरु झाली.हे अगदी खरे आहे .पण आज शाळाशाळातुन पाहिलं तर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा खालावलेला आहे असंच चित्र आपणाला दिसतं .मुलांना शिस्त नाही.अभ्यासाचं वेड नाही.सारखी टि.व्ही पाहतात.खेळतात .अशा चर्चा ऎकायला येतात.या बाबींसाठी विचार मंथन होणेआवश्यक आहे ,विचार होतोय सुध्दा मात्र बदल काय होत नाही.याला कारण एकच आजार कळालेलाआहे.औषध पण माहित आहे पण ते घ्यायच कधी आणि कसं याची कल्पना नाही .त्यामुळे आजार बळावतच चाललेला आहे.
आपल्या समाजाची प्रवतीचअशी आहे हे “काखेत कळ्सा आणि गावाला वळ्सा” यासाठीचा उपचार आपल्या स्वत:च्या जवळ्चआहे. स्वत: काही करण्यापेक्षा इतरांवर टिका करणे आपली बुध्दी ,शक्ती वाया घालविणे.
आता आपण नेमकं कायकरायच कि ज्यायोगे समाजात बदल होईल. आपणाला हे माहितच आहे कि आग लागण्यासाठी तीन गोष्टींचीआवश्यकता असते.इंधन,ऒक्सिजन व पुरेशी उष्णता हे तीन घटक एकत्र आले तरच आग तयार होते.त्याचप्रमाणे विद्यार्थी जर घडवायचा असेल तर विद्यार्थी ,शिक्षक व पालक हे तिन घटक जर एकत्रआले तर निश्चित बदल घडणार.विद्यार्थी घडविणे हि सर्वस्वी जबाबदारी फक्त शिक्षकांचीच नसून पालकांची पण आहे.
या साठी पालकांनी कायकेले पाहिजे या विषयी थोडे – पालकांनी जरा भुतकाळात डोकवावे आपला जन्म कोणत्या सालीझाला .त्या काळातील समाज व्यवस्था,प्रगती याचा आढावा घ्यावा .लक्षात असे येईल की प्रगतीफ़ारशी झालेली नव्हती टि .व्ही हा प्रकार नव्हताच मग आपण शाळा कशी शिकलो .आपले आई वडीलआपल्याला अभ्यास करा असे म्हणत होते का? आपलादिनक्रम काय होता.मनोरंजनाची साधने होती काय ? शाळातुन वार्षीक स्नेहसम्मेलन व्हायचीका? लोकाचा प्रतिसाद कसा होता .त्या नंतर आपल्या काळात टि.व्ही केव्हा आला त्या नंतरबदल काय झाला .आपण ज्या वर्गात शिकत होतो त्या वर्गातील आपले वर्ग बंधू भगिनी त्यावेळी काय करत आपण टि.व्ही च्या आहारी गेलो किंवा नाही. हा आढावापालकांनी घ्यावा.
माझे मनोगत समाजातीलया बद्लांचा विचार केला .तर १९८५ सालामध्ये प्रत्येक गावांत ग्रामपंचायत कार्यालयातहा टि.व्ही आला. वेळ फार कमी असायचा चार ते साडे चार तास फक्त तरीही गर्दी व्हायची.नंतरतीन चार वर्षात व्ही .सी .आर आले. गावोगावीयाची सेंटर्स दिसू लागली मग काय मुलांची चांदी या काळात काहीजण या प्रगतीच्या आहारीगेले. नवनवीन सिनेमे बघायचे शाळा बुडवायची संध्याकाळच्या वेळी पारावर बसायचं अनं शाळकरीमुलींच्या छेड काढायच्या कारण सिनेमांनी आम्हाला दिलेले धडे गिरवणे आवश्यक होत. याप्रकारात जे होते ते आज काय करताहेत व ज्या मुली या मुलांच्या आहारी गेल्या त्यांचीस्थिती आज काय आहे .या प्रश्नांची उत्तरे म्हणजे त्या वेळी भरकटलेली(टि.व्हीच्या आहारीगेलेली) मुलं आज मजुरी करत आहेत ,तर मुलींच्या हाती खुरपे आहे.
मात्र ,हिच मुले हिआजची पालक मंड्ळी झाली आहेत.यांना आपल्या काळात जे काही होते याची पुर्ण कल्पना आहेत्याचे साक्षीदार ते स्वत: आहेत .काळाबरोबर ती आज बदलली आहेत.मात्र त्यांच्या काळातीलजुन्या कल्पना आजही हे आपल्या मुलांवर लाद्त आहेत. मुलांना सांगतात,”अरे,आमचे आई बाबाआम्हाला कधी अभ्यास कर असे म्हनत नव्हते आज आम्ही तुम्हाला सर्व काही पुरवतोय मग शिकायलाकाय होतय. मी शाळेत जायचो तेव्हा पायात चप्पल नसायची ,चड्डीला ठिगळे असायची द्प्तरबंधा ची पिशवी असायची. शिक लेका नाही तर बोंबलतफिराव लागलं.
पुढे १९८५ नंतर १९९५साला पर्यंत जर आपण कोणत्याही शाळेची यशोगाथा सांगणारा फलक जर नजरे खाली घातला तर याकाळातील निकाल हे कमी लागलेले आहेत असेच लक्षात येते.मात्र १९९५ नंतर मात्र हा निकाल वाढ्त गेलेला आहे हे पण जाणवते.मग अचानक असा बद्ल कसा काय झाला? कारण जाहिराती शहरातील गोष्टी गावात आल्या पुस्तकांचीजागा मार्गदर्शकाने घेतली. विचार करुन अभ्यास करण्याची प्रवती संपुन घोका आणि ओका हेतंत्र सुरू झाले.शिक्षकाचे काम अप्रत्यक्ष रित्या कमी झाले . परंतु हि मुले खरचं बुध्दिवान आहेत का स्पर्धा परीक्षेसाठी पात्र ठरतात का ? मग प्रश्न उभा राह्तो तो मराठी भाषिक मुलांना प्रशासकिय सेवेतनोकरी लागण्याचा तिथ हि मुलं कमी का पडतात .लेखी परिक्षेत भरघोस यश प्राप्त करतात मात्रमौखिक चाचण्यातुन नापास होतात. असे का होते याचेवर विचार होंणे गरजेचे आहे.
यासाठी काळाची गरजऒळखुन आपणच या गोष्टीवर मार्ग काढायला हवा. तो म्हणजे असा कि, आपल्या पालकांनी आपल्याशीकधी सुसंवाद साधला नाही .याचा अर्थ असा नाही की आपणही आपल्या मुलांशी असच्ं वागावंकित्येक घरातुन असं चित्र दिसतं कि मुलं वडीलांशी मनमोकळे पणाने बोलत नाहीत ,बोलतातते फक्त कामापुरते ,मात्र आई बरोबर वाद घालत बसतात. पालक म्हणुन आपली जबाबदारी आहेकी आपण आपल्या पाल्या बरोबर दररोज सुसंवाद साधला पाहीजे .कारण आपली मुलं हिच आपली संपत्तीआहे असं आपण म्हनतो मग या संपत्तीचे रक्षण व देखभाल करण्याची जबाबदारी हि आपलीच नव्हेका ? सुसंवाद हा कोणत्याही विषयावार असावा की ज्यायोगे विचारांची देवाणघेवान होईल.सुसंवादाच कौशल्य त्याच्यामध्ये विकसीत होईल.कधि दप्तरातील वही पाहून त्यावर चर्चाकरावी.शाळेत आज नविन काय शिकवील.,शिकलास याबाबत विचारणा करावी.आपल्या कामाच्या धकाधकीच्याजीवनात शाळेत जाऊन भेटणे शक्य नसल्यास मुलाच्या वहीच्या माध्यमातुन शिक्षकांपर्यत जाऊशकतो. मुलांनाही वाटते की पालक अभ्यासाकडे लक्ष देतात.पालकांना असे वाटत की अभ्यासातलंमला काय कळायच आहे. मुलांना आपल्या पालकांबद्द्ल आदरच असतो आपल्या पालकाला काही येतनाही असा विचारही त्यांच्या ध्यानीमनी नसतो मग आपणच का करावा .
आज मुलं टि.व्ही खुपपाहतात.पण या त्यांच्या सवयीतुन मुल काही शिकतच असतात आपणच म्हनतो की आजची पिढी खुपहुशार आहे .लहान लहान मुलं बघीतली की आपण त्यांचे कौतुक करतो.(दुस-याची मुलं) मग आपल्याचमुलाला आपण नाव का ठेवतो ? आज पाचवी सहावी मध्ये शिकणा-या मुलांना जे द्न्यान आहे तेआपल्या काळात आपल्या होतं का उत्तर नाही असंच मिळणार आहे . मग जी सवय मुलांना जास्तआहे त्यामुळे त्यांच नुकसान का आणि कसं होते. आपण स्वत:ला प्रश्न विचारुन पहा ही मुल किंवा आपण टि.व्ही पाहतो म्हणजे नेमकेकाय करतो ,मनोरंजन असचं ना.की स्वत:ला त्या पात्रात हरवुन घेतो. त्याच्या बरोबर हसायच,रडायच,रागावायचअशा भावनामय व्हायच. हेच करतोना आपण हळूहळू या पात्रात हरवुन जाण्याची सवयच लागते तीएखाद्या व्यसनासारखी लाईट नसली की ही मुलं बैचेन होतात कुठेही लक्ष लागत नाही.खेळतातमात्र लाईट आल्याचा आनंद त्यांना जास्त होतो असे लक्षात येते. मग यांना या व्यसनापासूनपरावत कसे करायचे हा मोठा प्रश्न आहे .पालक मारणे हा पर्याय निवडतात याने मुलं स्वत:पासूनदुरावली जातात. त्याची सवय मात्र बदलत नाही. यासाठी पालकांनीच पुढाकार घेणे आवश्यकआहे .यासाठी मुलांच्या बरोबर बसून टि.व्ही पहा मात्र मुलांना त्या पात्रात हरवू देवूनका यासाठी नकळत पणे त्याला प्रश्न विचारा कि,तो काय करतोय त्याचं नाव काय वैगेरे वगैरेयामुळे काय होईल तर मुल एकटक टि.व्ही कडे पाहत होती ती तुमच्या प्रश्नाकडे लक्ष देतीलत्याची उत्तरे देतील. याची तुलना ती शाळेतील कामाशी करतील की लक्ष देवून ऎकल पाहीजेजसे आई बाबा विचारतात त्या प्रश्नांची उत्तरे आपण देतोय तसेच शाळेत शिक्षकही विचारतातत्यांनाही उत्त्र देता येते.विचार करण्याची सवय जी कालबाह्य झाली आहे ती वाढेल. ह्ळूहळु् टि.व्ही पाहण्याची सवय कमी होईल.त्याला मार्गदर्शकापेक्षा पुस्तकांचे वाचन करण्याचीसवय लावा.आपण तासनतास वर्तमानपत्र वाचण्यापेक्षा मुलांच्या समोर त्याच्याच दप्तरातीलएखादे पुस्तक काढून वाचा कि त्याला वाटेल माझ्या पुस्तकात असे काय आहे की बाबा ते वाचतायततो स्वत: ते वाचेल.
पालकांनी स्वत: मध्येबदल करुन पहावा काळाचे आपणाला हेच आव्हान आहे .स्वत: साठी नाही तरी आपल्या मुलांच्याभवितव्यासाठी आपले जुनाट असलेले विचार बाजुला ठेऊन नविन प्रवाहात सामिल व्हायलाच हवे.

No comments:

Post a Comment